Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

दिलासादायक! हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता

हाफकिन संस्थेत महिन्याला १ कोटी पर्यंत लसींचं उत्पादन करण्याची क्षमता आहे.

दिलासादायक! हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता
SHARES

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीनं कोवॅक्सीन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं मान्यता दिली आहे.

आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनानं ही परवानगी दिल्यानं महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरुवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे.

कोवॅक्सीन बनवण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावं. तसंच हाफकिनमध्ये यादृष्टीनं लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं आहे.

महाराष्ट्र सरकार आता स्वबळावर कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक लसचं उत्पादन करणार आहे. राज्याला २४ कोटी लसची गरज आहे. त्यासाठी आता लसींचं उत्पादन वाढवणार आहे. हाफकिन संस्थेत महिन्याला १ कोटी पर्यंत लसींचं उत्पादन करण्याची क्षमता आहे.हेही वाचा

संचारबंदीतील निर्बंधांबाबत मनात गोंधळ? हे वाचा मिळेल उत्तर

रूग्णसंख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सक्त ताकीद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा