मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जातो. याच पार्श्वभूमीवर १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व तरुणांना कोरोना लस दिली जाणार आहे. राज्यात वाढणाऱ्या कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी केंद्र हा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
सध्यस्थितीत ६० व ४५ वर्षांवरील नागरकांचं लसीकरण केलं जात असून ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. अशातच १ तारखेपासून १८ वर्षांपुढील तरूणांना लस दिली जाणार आहे. त्यामुळं लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाय, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस कधी देणार आणि याच दरम्यान १८ वर्षांपुढील तरुणाईला लस देणं शक्य होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
अशातच १८ वर्षांपुढील लसीकरणासाठी केंद्र सरकारनं मास्टर प्लॅन तयार केला आहे. जाणून घेऊया काय आहे या मास्टर प्लान मध्ये?
हेही वाचा -
सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे
लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी