असं असलं तरी नागरिकांचा लसीकरमुंबईसह पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण यासोबतच लसीकरण मोहीम देखील जोरात सुरू आहे.ण मोहिमेला मिळणारा पाठिंबा अत्यल्प आहे. म्हणूनच काही ना काही संकल्पना राबवून नागरिकांना आकर्षित केलं जातंय.
‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढवली आहे. लस घ्या अन् बाकरवडी घरी घेऊन जा.. या संकल्पनेतून जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जावं हा उद्देश या उपक्रमामागे आहे.
Attention all Punekars !!
— Indraneel Chitale (@cIndraneel) April 4, 2021
Who all is taking the vaccine shot tomorrow?
With help from @sudhirmehtapune and @ppcr_pune , @ChitaleGroup has kept Bakarwadi treats at various centres for those taking the shot!
Tweet out if you are the lucky one to get the packet!!! @DeoSahil pic.twitter.com/DQH1nnbe7K
पुण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहनपर खाद्य पदार्थ देण्यात येणार आहे. इंद्रनील चितळे यांनी पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सच्या माध्यमातून याबाबतचे ट्विट केलं आहे. आठवडाभरात या माध्यमातून मिळून साधारण १५ हजार बाकरवडीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.
पण यासाठी कोणतेही लसीकरण केंद्र ठरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेनं लस घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला १ लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचाच हा एक भाग मानला जात आहे.
Its started already!
— Indraneel Chitale (@cIndraneel) April 5, 2021
Great team effort under guidance of @sudhirmehtapune pic.twitter.com/xSGdzE8rtT
कोणत्याही एका केंद्रावर आम्ही बाकरवडीची पाकिटे देणार नाही. तर स्वयंसेवकांमार्फत वेगवेगळ्या केंद्रांवर पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये, हा यामागचा उद्देश असल्याचं चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे म्हणाले.
हेही वाचा