Advertisement

सेंट जॉर्ज रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा


सेंट जॉर्ज रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा
SHARES

सेंट जॉर्ज रुग्णालयात गेली अनेक वर्ष सिटी स्कॅनचे मशिन रुग्णांसाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे या रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागत होती. पण, आता रुग्णांची वणवण थांबणार आहे. कारण, येत्या सप्टेंबरपर्यंत सिटी स्कॅनची सुविधा सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

सिटी स्कॅनसाठी रुग्णांना जे. जे. रुग्णालय, जी. टी. रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात आधी पाठवत होतो. पण, आता रुग्णालयात सिटी स्कॅन चाचणीची सोय उपलब्ध आहे. यासंदर्भात जे. जे.चे अधिष्ठाता आणि सरकारी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत अनेक बैठकाही झाल्या. त्यानंतरच हे मशिन उपलब्ध झाले.

डॉ. मधुकर गायकवाड, वेद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

रुग्णालयाच्या बाहृयरुग्ण विभागात दररोज जवळपास 500 रुग्ण उपचारासाठी येतात. यातील अपघाती आणि मेंदूचा विकार असलेल्या रुग्णांचे सिटी स्कॅन करावे लागते. पण, रुग्णालयात यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती, असेही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयात सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी सरकारला पत्रही पाठवले होते. त्यानुसार यावर्षी सरकारने 7 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातूनच रुग्णालय प्रशासनाने सिटी स्कॅन मशिन खरेदी केली आहे.

डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, सर जे. जे. रुग्णालय


हेही वाचा - 

रक्त चाचणी, सिटी स्कॅनसह सर्व वैद्यकीय चाचण्या होणार स्वस्त


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा