Advertisement

मार्चपासून बाजारात येणार स्वदेशी को-वॅक्सीन, 'इतकी' असेल किंमत

कोरोनाची व्हॅक्सीन मार्चपासून शहराच्या मेडिकल स्टोर्समध्येही मिळू शकते.

मार्चपासून बाजारात येणार स्वदेशी को-वॅक्सीन, 'इतकी' असेल किंमत
SHARES

सध्या केवळ फ्रंट वॉरियर्ससाठी आलेली कोरोनाची व्हॅक्सीन मार्चपासून शहराच्या मेडिकल स्टोर्समध्येही मिळू शकते. भारत बायोटेकनं याची तयारी सुरू केली आहे.

सप्टेंबरमध्ये सीरम इंस्टीट्यूट देखील कोवीशिल्डला बाजारात आणू शकते. याची किंमत ९०० ते १००० रुपये असेल. भारत बायोटेक कोव्हॅक्सीनला २४ मार्चला बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्यावर्षी याच दिवशी लॉकडाऊन लावण्यात आले होते.

कंपनीचे नॅशनल हेड शोएब मलिक सांगतात की, कोव्हॅक्सीन सध्या सरकारला पुरवत आहोत. वितरकांशी बैठक घेतल्यानंतर लस साठवण सुविधांची तपासणी केली गेली आहे.

लवकरच लस बाजारात आणण्याची तारीख निश्चित केली जाईल. बाजारात लस आणण्यासाठी सरकारच्या मंजुरीची गरज नाही. आम्ही पूर्णपणे तयार आहोत, मार्चच्या अखेरीस ही लस बाजारात आणू.

तर, सीरम इंस्टीट्यूटचे रीजनल सेल्स मॅनेजर अजय द्विवेदी म्हणतात की, सध्या जे उत्पादन होत आहे त्यातील ५० टक्के उत्पादन देशात आणि उर्वरित परदेशात पाठवले जात आहे. ऑगस्टपर्यंत आमची लस बाजारात आणली जाईल.

मलिक यांच्या मते, दोन लस तयार केल्या आहेत त्या १८ वर्षांपेक्षा जास्त वयासाठी आहेत. कोव्हॅक्सीनची मुलांवर ट्रायल करण्याची परवानगी मिळाली आहे.

१० दिवसात देशभरच्या १५ सेंटर्सवर मुलांवर याची ट्रायल सुरू होईल. भारत बायोटेक इंजेक्शन व्हॅक्सीन व्यतिरिक्त नेजल स्प्रेवरही काम करत आहे. डॉक्टर्स प्रयत्न करत आहते की, ज्या रस्त्यानं इंफेक्शन येतं, त्याच रस्त्यावर ते संपवलं जावं.

जगभरात कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोज दिले जात आहेत. यामध्ये दुसरा डोज बूस्टर म्हणून दिला जातोय. मलिक सांगतात की, भारत बायोटेक कोरोना नष्ट करण्यासाठी सिंगल डोजवरही काम करत आहे. चमकी बुखारसाठी देखील जगभरात दोन डोज दिले जातात. मात्र केवळ भारत बायोटेकने याची एक डोजची व्हॅक्सीन बनवली होती.



हेही वाचा

मुंबईत कोरोना लसीकरणाचा तिसरा ड्राय रन

कोरोना लसीमुळे नुकसान झाल्यास भरपाई कंपनी करेल?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा