• जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने...
SHARE

7 एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन. दरवर्षी हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पण, आजही या दिवसाविषयी तितकी जनजागृती नसल्यामुळे या दिवसाचं नेमकं महत्त्व काय? हे तरुण वर्गाला माहीत नसल्याचं 'मुंबई लाइव्ह'ने केलेल्या रिअॅलिटी चेकमधून समोर आलंय. 'मुंबई लाइव्ह'ने मुंबईतल्या दादर परिसरात काही तरुणांशी जागतिक आरोग्य दिनानिमित्त बातचित केली. पण, बऱ्याच तरुणांना आजच्या दिवसाचं महत्त्व काय? तसंच आजचा दिवस काय म्हणून ओळखला जातो हेही माहीत नव्हतं.

कारणाशिवाय उदास वाटणं, कुठल्याच कामात रस न वाटणं, एकलकोंडेपणा ही सर्व उदासीनता वाटण्याची लक्षणे आहेत. हळूहळू उदासीनता हाच तुमचा मूळ स्वभाव बनतो. ज्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. त्यातून ब्लडप्रेशर, लठ्ठपणा, हृद्यविकाराचा झटका असे आजार प्रामुख्याने जडतात. घड्याळ्याच्या काट्याशी बरोबरी करता करता बरेचदा आपल्या आरोग्याचं गणित चुकतं. हे चुकलेलं गणित जर सुधारायचं असेल तर तणावमुक्त आणि नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी रहा हाच संदेश जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई लाइव्ह तुम्हाला देत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या