Advertisement

मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर भागात 'इतके' रुग्ण

पालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मालाडमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर भागात 'इतके' रुग्ण
SHARES

मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागांमधील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता या भागात पालिकेनं कडक बंदोबस्त ठेवला आहे. यासह, या ठिकाणी ताप मोजणीसाठी क्लिनिक देखील सुरू करण्यात आले आहेत. जेणेकरुन लवकरात लवकर लोकांची तपासणी करता येईल. तथापि, पालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या सर्व प्रभागांपैकी मालाडमध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

पालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १२ जुलैपर्यंत मालाडमधील कोरोनामुळे एकूण ५ हजार ७६९ लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी ३ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी आले. तर २२८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दहिसरमध्ये १२ जुलैपर्यंत २ हजार १८६ कोरोना रुग्ण आढळले. ज्यामध्ये १ हजार ३९१ रुग्ण बरे झाले. तर ८४ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले.

बोरिवलीमध्ये १२ जुलैपर्यंत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ३ हजार ८१० वर पोहोचली आहे. त्यापैकी २ २४७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १२२ लोक मरण पावले आहेत. १२ जुलैपर्यंत कांदिवलीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३ हजार ७८९ च्या घरात गेली आहे. त्यापैकी २ हजार ३७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.हेही वाचा

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅबचा तुटवडा नाही!

मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५० दिवसांवर

Containment Zones List: 'असे' आहेत ठाणेमधील कंटेन्मेंट झोन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा