Advertisement

महापालिकेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या कोरोनामुळं मृत्यू


महापालिकेच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या कोरोनामुळं मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या व्हायर्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत होते. परंतु, या कोरोनाने महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं. मुंबई महापालिकेच्या २ हजार १९८ अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार १५० जण बरे झाले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांची संख्या अधिक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के उपस्थिती असताना पालिका कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू पालिका कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रातीलच नव्हे, तर अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारी करोनाविरोधातील लढाईत सक्रिय आहेत.

प्रतिबंधित क्षेत्र, कोरोना काळजी केंद्रे, विलगीकरण कक्ष आदी ठिकाण २ वेळ जेवण वितरणाची जबाबदारी करनिर्धारण व संकलन विभागावर सोपविण्यात आली. या लढाईमध्ये सहभागी झालेल्यांपैकी २ हजार १९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी एक हजार १५० कर्मचारी उपचाराअंती बरे झाले.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे १७३ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत रविवारी दिवसभरात १२६३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४४ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, रविवारी मुंबईत कोरोनाचे १२६३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९२ हजार ७२० इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात १ हजार ४४१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६४ हजार ८७२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.हेही वाचा -

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा