Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅबचा तुटवडा नाही!

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत ४ सदस्यांची एक समिती नेमली आहे.

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅबचा तुटवडा नाही!
SHARES

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत ४ सदस्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून १० दिवसात शासनाला अहवाल सादर करणार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (maharashtra government appointed a committee for study on rapid antibody covid 19 test and kit

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रणजीत माणकेश्वर, प्रा.डॉ.अमिता जोशी हे सदस्य आणि आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. 

समितीचं काम काय?

  • आयसीएमआरने रॅपिड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे
  • या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसंच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करायच्या याबाबत शिफारस करणे
  • शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करणे

हेही वाचा - नालासोपाऱ्यातील प्लाझ्मा बँक ठरली डोनर देणारी MMR मधील पहिली बँक

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅबचा पुरेसा साठा  

दरम्यान रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे महाराष्ट्रभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

डॉ. शिंगणे यांनी नुकतीच मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तालयामध्ये मे. सिप्ला व मे. हेट्रो हेल्थकेअर या कंपन्यांचे प्रतिनिधी, वितरक/ विक्रेते यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी औषधाची उपलब्धता, त्यांचं वितरण व आकारण्यात येणारी किंमत याबाबत माहिती घेतली.  

मागणी जास्त उत्पादन मर्यादीत

महाराष्ट्रासाठी येत्या आठवड्यात रेमडेसिवीर या औषधाचे साधारणत: २१५०० व्हायल्स उपलब्ध होणार असल्याचं उत्पादकांच्या प्रतिनिधीने यावेळी सांगितलं. तसंच टोसीलीझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्याने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुद्धा या औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करावेत, असंही डॉ. शिंगणे यांनी सांगितलं.

देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. मात्र या औषधांचा उत्पादन व पुरवठा मर्यादित आहे. सध्या मे. हेट्रो रेमडेसिवीरचं उत्पादन हैद्राबाद इथं करत आहेत व लवकरच नवसारी गुजरात इथं उत्पादन सुरू होणार आहे.  मे. सिप्ला यांचं रेमडेसिवीरचं उत्पादन बडोदा, गुजरात इथं सुरु असून भविष्यात गोवा इथं उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे या औषधाचा पुरवठा वाढेल.

ही औषधं अत्यावश्यक असेल तेव्हाच हे डॉक्टरांनी रुग्णास प्रिस्क्राईब करावी. तसंच या औषधाच्या काळाबाजार करणाऱ्यांबाबत काही माहिती असल्यास ती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक  1800222365 वर देण्यात यावी, असं आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा