Advertisement

Covid-19 Test: आता महापालिका करणार प्रत्येक वाॅर्डात रोज २५० अँटीजेन चाचण्या

खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने प्रत्येक वाॅर्डात दररोज २५० कोरोना चाचण्या घेण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिके (BMC)ने सर्व सहाय्यक आयुक्तांना गुरूवार ९ जुलै रोजी दिले आहेत.

Covid-19 Test: आता महापालिका करणार प्रत्येक वाॅर्डात रोज २५० अँटीजेन चाचण्या
SHARES

खासगी प्रयोगशाळांच्या मदतीने प्रत्येक वाॅर्डात दररोज २५० कोरोना चाचण्या घेण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिके (BMC)ने सर्व सहाय्यक आयुक्तांना गुरूवार ९ जुलै रोजी दिले आहेत.

मुंबई महापालिकेने जवळपास १ लाख अँटीजन कोरोना टेस्टींग किट खरेदी केल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. या अँटीजन टेस्टींग किटच्या माध्यमातून अवघ्या ३० मिनिटांमध्ये एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आहे किंवा नाही हे कळू शकतं. मुंबईतील उपनगरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण वाढत असताना या अँटीजन किटच्या माध्यमातून कोरोना संक्रमित व्यक्ती शोधून काढण्याला महापालिकेने प्राधान्य दिलं आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांचं प्रमाण जास्त असणाऱ्या वाॅर्डात या किट पुरवण्यात येतील.

एकिकडे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा कालावधी ४४ दिवसांचा असताना R/ Central (बोरीवली) वाॅर्डातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा कालावधी हा २२ दिवसांचा आहे. तर R/South (कांदिवली) वाॅर्डात कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा कालावधी २५ दिवसांचा आहे.   

हेही वाचा - मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या

R-N (दहिसर), R-C (बोरीवली पश्चित), R-S (कांदिवली), P-N (मालाड), P-S (गोरेगाव), K-E (अंधेरी पूर्व) and K-W (अंधेरी पश्चिम), अशा विभागांमध्ये संशयित कोरोना रुग्ण आणि हाय रिस्क काँटॅक्ट मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात K-E वाॅर्डात COVID-19 सर्वाधिक ५,५०७ रुग्ण आढळून आले होते. तर K-W वाॅर्डात ४,७०६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते.  

महापालिका रुग्णालय तसंच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या टेस्टींग किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या नियमावलीनुसार चाचणी आयोजित करण्याचे सर्व रुग्णालय अधिष्ठातांना निर्देश देण्यात आले आहे. "आयसीएमआर" मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैद्यकीय प्रयोगशाळा आरटी-पीसीआर तपासणी करू शकतात. 

दरम्यान, मुंबईत कोरोना चाचण्यांची क्षमता वाढली असून आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या झाल्या असल्याची महिती मुंबई महापालिकेने दिली आहे. पालिकेकडून कमी  चाचण्या होत असून प्रशासन आकडेवारी योग्यरित्या देत नसल्याचे आरोप महापालिकेने फेटाळून लावले आहेत. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा