Advertisement

'या' कोरोना केंद्रांचं खासगीकरण अंतिम टप्प्यात

कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी मुंबईत सोमय्या, कांजूरमार्ग आणि मालाड कोरोना केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

'या' कोरोना केंद्रांचं खासगीकरण अंतिम टप्प्यात
SHARES

कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी मुंबईत सोमय्या, कांजूरमार्ग आणि मालाड कोरोना केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या कोरोना केंद्रांचं खासगीकरण करण्यासाठी जाहीर केलेल्या निविदांना प्रतिसाद दिलेल्या ४ कंपन्यांची निवड केली असून यातून अंतिम निवड करून लवकरच याचे कंत्राट देण्यात येणार आहे. सध्या मुंबईत मुलुंड, नेस्को (गोरेगाव), एनएससीआय (वरळी), बीकेसी, सेव्हन हिल्स आणि भायखळा येथील करोना रुग्णालये पालिकेमार्फत चालविली जातात.

बीकेसीमधील अतिदक्षता विभाग आणि दहिसर करोना केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्यास दिले होते. परंतु आता पालिकेने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सोमय्या, कांजूरमार्ग आणि मालाड येथील कोरोना केंद्रही खासगी तत्त्वावर देण्याचे ठरविले आहे. यासाठीच्या निविदाही पालिकेने जून महिन्यात मागविल्या होत्या. या निविदांना प्रतिसाद दिलेल्यांमधून ४ कंपन्यांची निवड केली आहे. यातूनही अंतिम निवड केली जाणार आहे.

यात दहिसरच्या कोरोना केंद्रामध्ये जूनपर्यंत कार्यरत असणाऱ्या कंपनीचाही समावेश असून अन्य कंपन्या नव्या आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या अत्यल्प असल्यामुळे अद्याप मुलुंड, दहिसर आणि बीकेसी ही कोरोना केंद्रं पालिकेनं सुरू केलेली नाहीत. असं असताना मात्र या नव्या कोरोना केंद्राच्या खासगीकरणाची प्रक्रिया जलद गतीनं संपवून आत्ताच कंत्राट दिले जाणार आहे. त्यामुळे कंत्राट देण्याची घाई कशासाठी, अशी शंका उपस्थित के ली जात आहे.

या केंद्रांमधील सुविधा

  • सोमय्या इथं ७५० प्राणवायू खाटांसह बालकांसाठी १०० खाटांचे करोना केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 
  • इथं २०० खाटांचा अतिदक्षता विभाग असणार असून या व्यतिरिक्त ५० खाटांचा बालकांसाठी अतिदक्षता विभाग असेल.
  • मालाड इथं सुरू झालेल्या करोना केंद्रात १५३६ खाटा प्राणवायूच्या, तर ३८४ सर्वसाधारण खाटा आहेत. 
  • याशिवाय १९० खाटांचा अतिदक्षता विभागही कार्यरत असणार आहे.
  • कांजूरमार्ग येथील करोना केंद्रात १२०० प्राणवायू खाटा, ३०० सर्वसाधारण खाटा आणि १५० अतिदक्षता खाटा असणार आहेत. 
  • यात ५० खाटांचा बालकांचा अतिदक्षता विभागही असेल.
  • प्रतिदिन अतिदक्षता खाटेसाठी ६ हजार रुपये, प्राणवायूसाठी १५०० रुपये तर सर्वसाधारण खाटेमागे ८०० रुपयांप्रमाणे दर खासगी कंपन्यांना दिले जाणार आहेत.



हेही वाचा - 

२ ऑगस्टपासून सुरू होणार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचं लसीकरण

महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप युती होणार?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा