Advertisement

मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी, 'हे' आहेत संपर्क क्रमांक

मुंबईतील नागरिकांना आता घरात कोरोनाची चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिकेने तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी, 'हे' आहेत संपर्क क्रमांक
SHARES

मुंबईतील नागरिकांना आता घरात कोरोनाची चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिकेने तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा बुधवारपासून उपलब्ध झाली आहे.  या प्रयोगशाळांशी संपर्क साधून व तेथील तज्ज्ञांना आपल्या घरी बोलावून नागरिकांना चाचणी करवून घेता येणार आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार या खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त 4500 रुपये एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.

कोरोनाची चाचणी करण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे चाचणीसाठीचे शिफारसपत्र (Prescription) असणे आवश्यक आहे. हे पत्र नागरिकांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडून घेता येईल. ज्या व्यक्तींना दमा, श्वसनाचे आजार, निमोनिया, ताप, थंडी, खोकला यासारख्या बाबी आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी करवून घेण्यास हरकत नाही.

5 खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नावे व संपर्क क्रमांक

सबर्बन डायग्नोस्टिक्स : 022-6170-0019

थायरोकेअर : 9702-466-333

मेट्रोपोलीस : 8422-801-801

सर एच एन‌ रिलायन्स : 9820-043-966

एसआरएल लॅब



हेही वाचा -

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 115 वर

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप

Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा