Advertisement

२ शिफ्टमध्ये होणार कोरोनाचे लसीकरण


२ शिफ्टमध्ये होणार कोरोनाचे लसीकरण
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळं कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले असले, तरीही त्याचा वेग वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. लशींच्या उपलब्धतेनुसार पालिका २ पाळ्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार करत आहे, तर राज्य सरकराने जिल्हा पातळीवरील मोठ्या रुग्णालयांमध्ये २ पाळ्यांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनुष्यबळाची उपलब्धता, लशींचा पुरवठा, शितसाखळ्यांची सक्षमता आणि त्या जिल्ह्यांमधील संसर्गाचे प्रमाण याचा अभ्यास केल्यानंतर दोन पाळ्यांमध्ये लसीकरणाच्या सुविधेला चालना देण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आता २९ खासगी रुग्णालायंमध्ये लसीकरणासाठी मान्यता दिली आहे. हे लसीकरण सशुल्क असले, तरीही काही रुग्णालयांनी 'वॉक इन' पद्धतीने लसीकरण करण्यास संमती दर्शवलेली नाही. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या १२ लाख इतकी आहे.

आरोग्य आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांपैकी काही जणांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. अधिकाधिक लोकसंख्येचा टप्पा वेगाने गाठण्यासाठी लसीकरण अधिक तप्तरेने व्हायला हवे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या मोठ्या लसीकरण केंद्रामध्ये ही व्यवस्था उपलब्ध आहे, पुरेसे मनुष्यबळ आहे अशा ठिकाणी २ पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू करता येईल. मात्र, लशींची तुटवडा पडणार नाही. मागणीप्रमाणे पुरवठा केला जाईल, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा