Advertisement

मुंबईत वाढणार लसीकरणाचा वेग

मुंबईसह आसपासच्या परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून, कोरोनाला नष्ट करण्यासाठी लसीकरण केलं जात आहे.

मुंबईत वाढणार लसीकरणाचा वेग
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून, कोरोनाला नष्ट करण्यासाठी लसीकरण केलं जात आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबई महापालिका युद्धपातळीवर काम करत असून, इथं सुरु झालेल्या लसीकरणानंही वेग पकडला आहे. मात्र, महापालिका एवढ्यावर थांबणार नसून, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येकास लस देतानाच आता ज्येष्ठ नागरिकांनादेखील कोरोनाची लस युद्धपातळीवर उपलब्ध व्हावी म्हणून काम वेगानं काम करत आहेत, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत सुरू असलेला लसीकरणाचा वेग असाच  कायम राहणार असून, १५ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. मागील मार्च महिन्यात कोरोनानं मुंबईत हातपाय पसरण्यास सुरूवात केली. मात्र, मुंबई महापालिकेनं धारावी, वरळीसह मालाड आणि इतर परिसरात केलेल्या उल्लेखनीय कार्यवाहीमुळं कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आलं.

विशेषत: आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी विविध स्तरावर विविध उपाययोजना हाती घेतल्या. यात नियंत्रण कक्षासह कोविड  सेंटर, चाचण्या, रुग्णालयतील वाढत्या सेवा सुविधा, सर्वेक्षण, गर्दीवरील बंधने, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीदरम्यान घालण्यात आलेली बंधने; अशा सर्वच कार्यवाहीमुळे कोरोना नियंत्रित होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत कोरोना लसीकरण वेगानं सुरु असून, फ्रंटलाईन वर्कनंतर लसीकरणाचं उर्वरित टप्पेदेखील हाती घेतले जाणार आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक असल्यानं आता ज्येष्ठ नागरिकांना १५ मार्चच्या आसपास लसीकरण केले जाणार आहे. राज्य सरकार यासाठी काम करत असून, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राने यात सहभागी होत कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलण्यात आला आहे.

मुंबईत ४६ खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाईल. दरम्यान, ५० वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे ३० लाखांवर आहे. तर दुसरीकडे येथील १ कोटी लोकसंख्येपैकी ३ लाख नागरिक १५ मार्चपर्यंत यासाठी पात्र ठरणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा