Advertisement

लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण

देशभरात सध्या फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोना लस दिली जात आहे. मात्र लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण होणार आहे.

लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण
SHARES

देशभरात सध्या फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोना लस दिली जात आहे. मात्र लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण होणार आहे. यासंदर्भात दोन ते तीन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेने शहरातील खाजगी रुग्णालयांची एक यादी तयार केली आहे. या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा असतील, वेटिंग रुम, ऑब्जर्वेशन रुम आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधा देणारी यंत्रणा असणार आहे.

खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु केल्यानंतर सुरुवातीला त्यांचे कर्मचारी, डॉक्टरांना लस दिली जाईल. राज्यात आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोना लस दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ६५२ केंद्राच्या माध्यमातून लसीकरण सुरु आहे.

कोविन अॅपवर आतापर्यंत १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार आरोग्य कर्मचाऱ्याचं लसीकरण झालं आहे. तर ५ लाख ४७ हजार फ्रण्टलाईन वर्कर्सची नोंद झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.



हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा