Advertisement

मुंबईतल्या 'या' भागात ठेवणार कोरोना लशीचा साठा

मुंबई महापालिकेनं (mumbai municipal corporation)आता कोरोनाची लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची यासाठी जागेची निवड केली आहे.

मुंबईतल्या 'या' भागात ठेवणार कोरोना लशीचा साठा
SHARES

मुंबई महापालिकेनं (mumbai municipal corporation)आता कोरोनाची लस आल्यानंतर तिची साठवणूक कुठे करायची यासाठी जागेची निवड केली आहे. लवकरच कोरोनाच्या लशीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेनं कोरोना लस साठवणुकीसाठी कांजूरमार्ग ते भांडुप या परिसरात एका जम्बो कोल्ड स्टोरेजची जागा निश्चित केली आहे. लशीसाठी तापमान हे वेगवेगळ्या अंशावर ठेवावं लागतं. त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणावर लशीची एका ठिकाणी साठवणूक करता यावी यासाठी महापालिका पश्चिम पूर्व उपनगर आणि शहर परिसर अशा तिन्ही ठिकाणी जागेचा शोध घेत होती.

तिन्ही जागांपैकी सध्या भांडुप, कांजूरमार्ग या परिसरात आता जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे. शहरापासून जवळच असल्यामुळे मोठ्या वाहनांची ये-जा करण्यास सोईचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये आणि मुंबई बाहेर लशीचा पुरवठा करण्यास सोपे ठरणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेनं गेले काही दिवस जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या कोरोना चाचणीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यानुसार बाजारात काम करणारे दुकानदार, फेरीवाले, बस ड्रायव्हर, कंडक्टर अशा लोकांची मोफत चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ५ दिवसांत आतापर्यंत १५० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलेली आहे.हेही वाचा

'या' ५ भागातील ७५ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या अॅन्टीबॉडीज सापडल्या

५५ वर्षावरील लोकांनी कोरोनाची लक्षणं हलक्यात न घेण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement