Advertisement

कोरोना व्हायरसमुळं कोंबडीविक्रीत मोठी घट

चिकनमधून कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण होते अशा अफवा समाजमाध्यमातून (Social Media) पसरल्यानं चिकन खाणाऱ्यांनी आपला मोह आवरला आहे.

कोरोना व्हायरसमुळं कोंबडीविक्रीत मोठी घट
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोना व्हायरसच्या (Corona virus) चर्चेनं जोर धरला आहे. नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, काही खाद्यपदार्थ (Foods) खाणं नागरिकांनी टाळलं आहे. यामध्ये मुख्यत: 'चिकन'चा (Chicken) समावेश आहे. कोरोना व्हायरसचा चिकन आणि अंडीमार्फत (Eggs) प्रसार होत असल्याच्या अफवा वेगानं पसरत आहेत. परिणामी कोंबडीविक्रीत मोठी घट झाली आहे. 

चिकनमधून कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण होते अशा अफवा समाजमाध्यमातून (Social Media) पसरल्यानं चिकन खाणाऱ्यांनी आपला मोह आवरला आहे. याचा परिणाम कोंबडी व्यवसायावर दिसून आला आहे. या अफवेमुळं त्याचा धसका पोल्ट्री व्यावसायिकांनीही घेतला असून आर्थिक (Finance) नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी उत्पादन कमी केलं आहे. परिणामी कोंबड्यांची (Chicken) आवक कमी होऊन चिकनच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

मागील ३ आठवड्यात देशपातळीवर या व्यवसायाला सुमारे १३०० कोटी रुपयांचा फटका बसल्याचं समजतं. देशभरात दररोज ६० तर महाराष्ट्रात १२ कोटींचं नुकसान सहन करावं लागत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. कोंबड्यांची विक्री जवळपास निम्म्यावर आल्यानं शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून आहे. अंड्यांच्या विक्रीतही देशपातळीवर १० टक्क्यांची घट झाल्याचं राष्ट्रीय अंडी समन्वय समितीकडून सांगण्यात आलं.

कोंबड्यांची वाढ होऊन ती विक्रीला येण्यास ४० ते ४५ दिवस लागतात. तोपर्यंत जवळपास ६५ रुपये खर्च येतो असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं उत्पादन खर्चापेक्षा विक्रीदर कमी असल्यानं शेतकऱ्यांना प्रति किलोमागे ३० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

बाजारात मागणी नसल्यानं व्यापारीही शेतकऱ्यांकडून माल घेण्याची तयारी दाखवत नाही आहेत. दरदिवशी प्रत्येक कोंबडीमागे जवळपास साडेचार रुपयांचा अधिकचा खर्च त्यांना सहन करावा लागतो.

राज्यात दरदिवशी ३ ते ३.५ हजार टन चिकनची विक्री होते. मात्र, समाजमाध्यमांवरील अफवांमुळे मागणी घटून हे प्रमाण दरदिवशी दीड हजार टनांपर्यंत खाली आलं. काही प्रमाणात अफवांचं निरसन झाल्यानं बाजार थोडाफार सावरला आहे. मात्र, बाजार पूर्वपदावर यायला आणखी १ ते २ आठवड्यांचा कालावधी जाणार असल्याची माहिती मिळते.हेही वाचा -

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला

सरकता जिना फिरला उलट्या दिशेनं; प्रवासी जखमीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा