Advertisement

मुंबईत 9 हजार जणांना कोरोनाची लक्षणंही नाहीत

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 32 हजारांवर गेली आहे. मात्र, यामधील 8 हजार 400 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत 9 हजार जणांना कोरोनाची लक्षणंही नाहीत
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 32 हजारांवर गेली आहे. मात्र, यामधील 8 हजार 400 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 9 हजार जणांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईत एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून जास्त म्हणजेच 17 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. एप्रिलमध्ये असणारा 7.6 मृत्यू दर आता 3.2 पर्यंत खाली आल्याचंही त्यांनी सांगितलं.

 पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना आता चांगलेच यश येत असल्याचे चहल यांनी सांगितलं. मुंबईत आता 15 हजार 800 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले.  केंद्रीय समितीच्या अहवालानुसार 31 मेपर्यंत मुंबईत 40 हजार रुग्ण कोरोनाबाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता मुंबईत 31 मेपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 26 ते 27 हजारांपर्यंत नियंत्रित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सध्या 456 ऍम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात आल्या असून ही सेवा वाढवण्यासाठी उबेरशी टायअप करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरूही करण्यात आली आहे. कंट्रोल रूमच्या माध्यमातून यावर नियंत्रण, समन्वय ठेवला जाईल असंही चहल यांनी सांगितलं. 



हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा