Advertisement

मुंबईत दिवसभरात 635 नवे रुग्ण, तर 26 जणांचा कोरोनाने मृत्यू

आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 2 हजार 128 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत दिवसभरात  635 नवे रुग्ण, तर 26 जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा धोका आता अधिक वाढला आहे. मंगळवारी महाराष्ट्रात  841 नवे रुग्ण आढळले असून त्यात मुंबईचे 635 नव्या रुग्णंचा समावेश आहे. राज्यातील आकडेवारीनुसार मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत एकूण 9758 रुग्ण आहेत. मंगळवारीवारी मुंबईत 26 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 387 वर जाऊन पोहचला आहे.

मागील दिवसांमध्ये मुंबईत कोरोना मृत्यूदर खाली आला होता. मात्र, पुन्हा मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी  भर पडली आहे. राज्यभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34 रुग्ण दगावले आहेत तर 30 एप्रिल रोजी सर्वाधित मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. 2 मे रोजी रोजी एकूण 27 जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, सोमवारी मुंबईत कोरोनाचे 771 नवीन रुग्ण आढळले आहेत.

4 मे रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे काही अहवाल आले असून, त्यात 120 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर मंगळवारी 515 नवीन रुग्ण मिळून आले आहेत, अशा प्रकारे मंगळवारी 635 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.  अशा रुग्णांची एकूण संख्या आता 12 हजार 306 इतकी झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात करोनाचे 220 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या एकूण 2 हजार 128 रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

एका आठवड्याची आकडेवारी

# 28 एप्रिल 393 रुग्ण 25 जणांचा मृत्यू

#29 एप्रिल 475 रुग्ण 26 जणांचा मृत्यू

#30 एप्रिल 417 रुग्ण 20 जणांचा मृत्यू

# 1 मे 751 रुग्ण 5 मृत्यू

# 2 मे 547 रुग्ण 27 मृत्यू

# 3 मे 441 रुग्ण 21 मृत्यू

# 4 मे 510 रुग्ण 18 मृत्यू

# 5 मे 771 रुग्ण 21 मृत्यू


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा