Advertisement

मुंबईत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा ४१वर

४१ पैकी मुंबईतल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील आकडा ४० वर गेला आहे.

मुंबईत कोरोनाचा आणखी एक रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा ४१वर
SHARES

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. मुंबईत आज कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर आणखी एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर पिंपरी-चिंचवडमधील एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. ४१ पैकी मुंबईतल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील आकडा ४० वर गेला आहे. 


घाटकोपरमध्ये आणखी एक रुग्ण

मुंबईत करोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे. तो अमेरिकेहून आला आहे. त्याला उपचारासाठी कस्तुरबामध्ये दाखल केलं आहे. हा रुग्ण घाटकोपर परिसरातील आहे. हा रुग्ण राहत असलेल्या परिसराची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे. त्यामुळं अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, तसंच स्वतःच काळजी घ्यावी, असं आवाहन स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी केलं आहे.  


पिंपरीत कोरोना रुग्ण

तर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला करोनाची लागण झाली आहे. पुण्यातील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १७ झाली आहे. पिंपरीमधील ही व्यक्ती अमेरिकेतून दुबईला गेली आणि नंतर मुंबईमार्गे पुण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.

रुग्णांच्या आकड्यात वाढ

परदेशवारी करून आलेल्या प्रत्येक नागरिकाची यापुढे कडक तपासणी केली जाणार आहे. घरी सोडण्यात आलेले नागरिक बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारनं करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. अनेक 'निर्बंध' उपाय योजिले आहेत. असं असताना, राज्यातील करोना रुग्ण आणि संशयित रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही.



हेही वाचा

Coronavirus : माहिती लपवणं, रुग्णालयातून पळून जाणं बेतेल जीवावर

Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा