Advertisement

पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार?

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार?
SHARES

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिकेनं कठोर निर्बंध जारी केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी वेगानं कार्यवाही सुरू झाली आहे. परंतु, टोलनाके, एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानकं इथं पर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणानं कोरोना चाचणी होणं आवश्यक असतानाच इथं मोठ्या अडचणी आहेत.

एसटी स्टँड आणि टोलनाक्यांवर तर अक्षरश: जीवाशी खेळ सुरू असून, रेल्वे स्थानकांत काही प्रमाणात आरोग्याची सुरक्षा घेतली जात आहे. मात्र हे प्रमाण देखील कमी असून, वेगानं वाढणारी कोरोनाचे लाट थोपवायची असेल तर टोलनाके, एसटी स्टँड आणि रेल्वे स्थानकं इथं वेगानं आणि ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचं चित्र आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेतली असता मुंबई महापालिकेनं मुंबई आणि वॉर्ड स्तरावर मोठ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मात्र, टोलनाक्यांवर याबाबत हलगर्जीपणा बाळगण्यात येत आहे. मुंबईत दाखल होत असतानाच दहिसर, वाशी, मुलुंड येथील २ आणि ऐरोली टोलनाक्यांवर कोरोनाची चाचणीच होत नसल्याचं समोर आले आहे. कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच असून, यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

मुंबईत दाखल होताना जे ५ टोलनाके लागतात, त्या टोलनाक्यांवर मुंबई महापालिकेकडून कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. मात्र ते बाहेरील जिल्ह्यांतून अथवा बाहेरील राज्यांतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करीत नाहीत. कारण त्यांना तशी कारवाई करण्याचं आदेशच नाहीत किंवा तसा काही प्रोटोकॉल नाही. प्रवाशांनी मास्क घातला आहे की नाही, एवढेच त्यांना तपासायचे आहे.

कोरोनाची चाचणी होत नाही. म्हणजे मराठवाडा किंवा विदर्भातील एखाद्या जिल्ह्यातून एखादा प्रवासी मुंबईत दाखल झाला तर त्याची कोरोना चाचणी टोलनाक्यावर होत नाही. मात्र अशा प्रवाशांत एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर मात्र तो अनेकांना लागण करू शकतो, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, परराज्यांतून जे प्रवासी महाराष्ट्रात दाखल होत आहेत, त्यांच्या कोरोना चाचण्या सीमेवरच केल्या जातात; त्यामुळे टोलनाक्यांवर अशा चाचण्या होत नाहीत.



हेही वाचा -

शरद पवारांनी उल्लेख केलेले ज्युलिओ रिबेरो कोण आहेत? जाणून घ्या

तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा