Advertisement

coronavirus update: मुंबईत आता ड्रोनच्या माध्यमातून होणार निर्जंतुकीरण

मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन (lockdown) अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

coronavirus update: मुंबईत आता ड्रोनच्या माध्यमातून होणार निर्जंतुकीरण
SHARES

मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन (lockdown) अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सूचना महापालिकेला देण्यात आल्या असून या भागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत मिळावी म्हणून गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यंमत्री टोपे म्हणाले, मुंबईत कोरोनाच्या (coronavirus) रुग्णसंख्येत होत असलेली मोठी वाढ चिंतेत टाकणारी आहे. याबाबत मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.

हेही वाचा - धारावी ठरतेय हॉटस्पॉट, १० दिवसांत होणार सर्वांचं स्क्रिनिंग

गर्दी नियंत्रणासाठी सक्ती

हे मुद्दे लक्षात घेऊन मुंबईतील (slum in mumbai) दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचं पालन सक्तीने होण्याची आवश्यकता आहे. लाॅकडाऊनचं पालन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत मिळावी यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात येईल. नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रस्त्यांवरील गर्दीवर  लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबतही निर्णय झाला आहे. सीसीटीव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

धारावीत स्वच्छेतला प्राधान्य

धारावीसारख्या (dharavi slum) दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालयांचा दिवसभरात अनेकदा वापर होतो अशा ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून ही शौचालये वारंवार स्वच्छ करणे. ड्रोनचा वापर करून निर्जुंतकीकरणासाठी फवारणी  करण्याचं काम करण्यात येईल.

हेही वाचा - मुंबईतील 'या' ४ विभागात ५० टक्के रुग्ण

मुंबईतील गर्दीच्या भागातील नागरिकांना शासनाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तयार अन्न घरपोच देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अगदी छोट्या खोलीत जास्त संख्येने लोक राहतात त्यामुळेही काही लोक रस्त्यावर दिसतात अशा लोकांसाठी त्या भागातील शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तिथं सामाजिक अंतर पाळत त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा