Advertisement

धारावी ठरतेय हॉटस्पॉट, १० दिवसांत होणार सर्वांचं स्क्रिनिंग

धारावीत पसरणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेनं स्पेशल प्लान तयार केला आहे.

धारावी ठरतेय हॉटस्पॉट, १० दिवसांत होणार सर्वांचं स्क्रिनिंग
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात मुंबई सर्वाधिक रुग्ण असल्याचं समोर येत आहे. मुंबईतली धारावी झोपडपट्टी हॉटस्पॉट ठरत आहे. प्रचंड गर्दी आणि दाटीवाटीत असलेली घरं यामुळे तिथं लागण झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून येतंय. ही लागण वेळीच रोखण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेनं स्पेशल प्लान तयार केला आहे.

यासंदर्भात मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन दीडशे डॉक्टर देणार आहे. त्यांच्या मदतीनं संपूर्ण धारावीतील लोकांचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे.


बैठकित झाला निर्णय

यात 2 खाजगी डॉक्टरांबरोबर दोन पालिकेचेे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची एक टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम्स तयार करून त्या 10 दिवसांमध्ये धारावीतल्या साडेसात लाख रहिवाशांचं स्क्रिनिंग करणार आहेत.


धारावीत 'हे' केलं जाणार

कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या लोकांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयसोलेशनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं ठळकपणे दिसून येतील त्यांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जाणार आहेत. ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोनच्या मदतीनं संपूर्ण धारावीचे सॅनेटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.


धारावी ठरतोय हॉटस्पॉट

धारावीत आतापर्यंत १७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा हा १४ होता. पण गुरुवारी आणखी ३ कोरोना रुग्ण आढळले. त्यात गुरुवारी आणखी एक महिलेचा कोरोनामुळे मत्यू झाला. या महिलेचं वय ७० होतं. या महिलेच्या मृत्यूनंतर धारावीत कोरोनाचे ३ बळी गेले आहेत. धारावीतील अनेक जागा सील करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

Coronavirus : धारावीत तिसरा बळी, ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

दाटीवाटीच्या परिसरात गर्दी पांगवण्यासाठी SRPF ची मदत घेणार- राजेश टोपे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा