Advertisement

टाटा रुग्णालयातर्फे फिवर क्लिनीक विभागाचं अनावरण

परळ येथील सेंट झेविअर्स मैदान इथं टाटा स्मारक रुग्णालयातर्फे 'फिवर क्लिनीक' विभागाचं अनावरण करण्यात येत आहे.

टाटा रुग्णालयातर्फे फिवर क्लिनीक विभागाचं अनावरण
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांवर तातडीनं व योग्य उपचार व्हावे यासाठी महापालिकेनं अनेक महत्वाची पावलं उचलली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनो वॉर्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा कोविड वॉर्ड सुरू केले आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत परळ येथील सेंट झेविअर्स मैदान इथं टाटा स्मारक रुग्णालयातर्फे 'फिवर क्लिनीक' विभागाचं अनावरण करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचं संकट संपूर्ण जगावर ओढावलेलं आहे. अशातच टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना फिवर क्लिनीकचा उपयोग करता येणार आहे. परळच्या टाटा रुग्णालयात मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळं या रुग्णांना या क्लिनीकचा अधिक फायदा होणार आहे. तसंच, त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे २४८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ८४६ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४२ रुग्ण दगावले आहेत. तर २२ जून रोजी २० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापूर्वी २१ जून रोजी रोजी एकूण ४१ जण या आजाराला बळी पडल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे ८४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६८ हजार ४८१ इतकी झाली आहे.

मुंबईत मागील २४ तासात  करोनाचे ४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३४ हजार ५७६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 



हेही वाचा -

Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

Salon And Beauty Parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा