Advertisement

मुंबईसाठी डाॅक्टर, नर्सची मानधन तत्वावर होणार नियुक्ती

बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. ज्यांनी बी.एसस्सी. किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, त्यांना दरमहा ३० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

मुंबईसाठी डाॅक्टर, नर्सची मानधन तत्वावर होणार नियुक्ती
SHARES

बृहन्मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स यांची आवश्यकता असल्याने त्यांची सेवा मानधन तत्वावर (doctors and nurses to be hired for COVID-19 treatment in mumbai, says amit deshmukh) घेण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. 

गरजेनुसार सेवा

जे डॉक्टर ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, ज्यांना कुठलाही आजार नाही आणि ज्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे, ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, अशा डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा ८० हजार रुपये मानधन दिलं जाईल. डॉक्टरांप्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. भूलतज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा २ लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.

हेही वाचा - कोविड १९ सेवेसाठी ४ हजार तरूण डाॅक्टारांची फौज मैदानात उतरणार

इथं करता येईल अर्ज

बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. ज्यांनी बी.एसस्सी. किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, त्यांना दरमहा ३० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस यांना हे मानधन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणार आहे. पात्र डॉक्टरांनी  https://forms.gle/PtCY3SvhvEA43WxV6  या गुगल शीटवर तसंच पात्र नर्सेस यांनी https://forms.gle/81LcWWajq1WNQ6cK8 या गुगल शीटवर अर्ज करावेत, असं आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.

विद्यार्थी मैदानात

दरम्यान, महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यःपरिस्थितीत तात्पुरती पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरवण्यात येणार आहे. एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे ४ हजार डॉक्टर्स सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील अमित देशमुख यांनी दिली.

हेही वाचा - गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा