Advertisement

कोविड १९ सेवेसाठी ४ हजार तरूण डाॅक्टारांची फौज मैदानात उतरणार

एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे ४ हजार डॉक्टर्स सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

कोविड १९ सेवेसाठी ४ हजार तरूण डाॅक्टारांची फौज मैदानात उतरणार
SHARES

महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना (maharashtra final year MBBS students to be awarded temporary certificates to join fight against corona) सद्यःपरिस्थितीत तात्पुरती पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरवण्यात येणार आहे.

नोंदणीची मुभा

एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे ४ हजार डॉक्टर्स सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, 'इतक्या' डॉक्टर्स, नर्सचं पथक मुंबईत दाखल

तात्पुरती प्रमाणपत्रे

इंटर्नशीप पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

इंटर्नशीप पूर्ण

नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०१९ मध्ये घोषित करण्यात आला होता. यात सुमारे ४ हजार विद्यार्थी एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांची इंटर्नशीप १ मार्च २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२० दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटर्नशीप पूर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पदवीदान समारंभाची वाट न पाहता या विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध  होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल असंही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा