Advertisement

बीकेसीतील दुसऱ्या कोविड-१९ रुग्णालयाच्या उभारणीला सुरूवात

एमएमआरडीएने रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरूवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यात १ हजार बेडची व्यवस्था असलेलं रुग्णालय उभारण्यात येईल.

बीकेसीतील दुसऱ्या कोविड-१९ रुग्णालयाच्या उभारणीला सुरूवात
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA)ने वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जागेत १००८ खाटांचं विशेष कोविड-१९ रुग्णालय (special covid-19 hospital) अवघ्या १५ दिवसांच्या आत यशस्वीरित्या पूर्ण केलं. पहिल्या टप्प्यातील हे रुग्णालय एमएमआरडीएकडून नुकतंच मुंबई महापालिकेच्या (bmc) ताब्यात देण्यात आलं आहे. यानंतर आता एमएमआरडीए दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाच्या कामाला सुरूवात केली आहे. 

एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी पहिल्या टप्प्यातील रुग्णालय मुंबई महापालिकेकडे सुपूर्द केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त आय. एस. चहल आणि राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता हे उपस्थित होते. येत्या शुक्रवारपासून या रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेण्यात येऊ शकेल, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा उपयोगात आणणार

गंभीर रुग्णांवरही उपचार

त्यानंतर एमएमआरडीएने रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरूवात केली आहे. दुसऱ्या टप्प्यात १ हजार बेडची व्यवस्था असलेलं रुग्णालय उभारण्यात येईल. यामध्ये १०० बेड हे आयसीयूची व्यवस्था असलेले असतील, तर  उरलेले ९०० बेड हे ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन असतील. आयसीयू बेडमुळे कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर देखील उपचार करता येतील.

दरम्यान, ज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार १३६ झाली असून मुंबईनेही २२ हजारांचा (२२,५५३) आकडा पार केला आहे.  मंगळवारी १९ मे रोजी दिवसभरात २१२७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात मंगळवारी १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

सर्वाधिक चाचण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा