Advertisement

मुंबईत १९० हून अधिक कोरोना रुग्ण बेपत्ता, महापालिका टेन्शनमध्ये

कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आलेले तब्बल 100 पेक्षा अधिक रुग्ण मुंबईत गायब आहेत. या रुग्णांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं पालिकेसमोर आहे.

मुंबईत १९० हून अधिक कोरोना रुग्ण बेपत्ता, महापालिका टेन्शनमध्ये
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मात्र, आता आणखी एक आव्हान पालिकेसमोर उभं ठाकलं आहे. कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आलेले तब्बल 100 पेक्षा अधिक रुग्ण मुंबईत गायब आहेत. या रुग्णांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं पालिकेसमोर आहे.  

कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत तर काही जण अर्धवट माहिती देतात. किंवा प्रयोगशाळांतील कर्मचारी अनावधानानं चुकीची माहिती भरतात.  त्यामुळे त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. मुंबईत १०० हून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता आहेत. हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिलेल्या पत्त्त्यावर राहत नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत, तर अनेकांचे फोनही बंद आहेत.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधार क्रमांकच्या माध्यमातून बेपत्ता असलेल्या व्यक्तींची सविस्तर माहिती मागितली आहे. मात्र, त्यांना अद्याप तशी मान्यता मिळालेली नाही.  

येथील रुग्ण गायब

अंधेरी पूर्वमध्ये 27 रुग्ण

अंधेरी पश्चिममध्ये 12 रुग्ण 

धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थमध्ये 21 रुग्ण

एस वॉर्डमध्ये 30 रुग्ण


हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा