Advertisement

coronavirus update: महाराष्ट्रात सर्वाधिक १.२ लाख कोरोना चाचण्या

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांच्या कोरोना चाचण्या (corona test) करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

coronavirus update: महाराष्ट्रात सर्वाधिक १.२ लाख कोरोना चाचण्या
SHARES

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या जात असून आतापर्यंत १ लाखांहून अधिक जणांच्या कोरोना चाचण्या (corona test) करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ६८१७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधित (coronavirus) ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण काेरोनाबाधित रुग्ण (corona positive) संख्या ६८१७ झाली आहे. शुक्रवारी ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

क्लस्टर कंटेनमेंट

सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) असून ८,८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. 

मुंबईतील ११ जण

शुक्रवारी राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०१ झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ११, पुणे इथं ५ तर मालेगाव इथं २ मृत्यू झाले आहेत. या मृत्यूंपैकी १२ पुरुष, तर ६ महिला आहेत. १८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत,तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूपैकी १२ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मृत्यूदर ४.४ टक्के

सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो.  ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे. यामुळे ५० वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचं अधोरेखित झालं आहे.

हेही वाचा - Coronavirus Update: कोरोना नमुण्यांसाठी मुंबईत १०० फोटो बूथ बसवणार

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

  • मुंबई महानगरपालिका: ४४४७ (१७८)
  • ठाणे: ३५ (२)
  • ठाणे मनपा: २२० (४)
  • नवी मुंबई मनपा: १२५ (४)
  • कल्याण डोंबिवली मनपा: १३१ (३)
  • उल्हासनगर मनपा: २
  • भिवंडी निजामपूर मनपा: १२
  • मीरा भाईंदर मनपा: ११८ (२)
  • पालघर: २१ (१)
  • वसई विरार मनपा: ११४ (३)
  • रायगड: १४
  • पनवेल मनपा: ४० (१)
  • ठाणे मंडळ एकूण: ५२७९ (१९८)
  • नाशिक: ४
  • नाशिक मनपा: ७
  • मालेगाव मनपा:  ११६ (११)
  • अहमदनगर: २५ (२)
  • अहमदनगर मनपा: ८
  • धुळे: ६ (१)
  • धुळे मनपा: १६ (१)
  • जळगाव: ६ (१)
  • जळगाव मनपा: २ (१)
  • नंदूरबार: ७ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: १९७ (१८)
  • पुणे: ४३ (२)
  • पुणे मनपा: ८४८ (६३)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ७० (२)
  • सोलापूर: १
  • सोलापूर मनपा: ३८ (३)
  • सातारा: २० (२)
  • पुणे मंडळ एकूण: १०२० (७२)
  • कोल्हापूर: ७
  • कोल्हापूर मनपा: ३
  • सांगली: २५
  • सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
  • सिंधुदुर्ग: १
  • रत्नागिरी: ८ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
  • औरंगाबाद:०
  • औरंगाबाद मनपा: ४२ (५)
  • जालना: २
  • हिंगोली: ७
  • परभणी: ०
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ५२(५)
  • लातूर: ९
  • लातूर मनपा: ०
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ०
  • नांदेड मनपा: १
  • लातूर मंडळ एकूण: १४
  • अकोला: ११ (१)
  • अकोला मनपा: १२
  • अमरावती: ०
  • अमरावती मनपा: १३ (१)
  • यवतमाळ: २३
  • बुलढाणा: २१ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: ८१ (३)
  • नागपूर: २
  • नागपूर मनपा: ९९ (१)
  • वर्धा: ०
  • भंडारा: ०
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: ०
  • चंद्रपूर मनपा: २
  • गडचिरोली: ०
  • नागपूर मंडळ एकूण: १०४ (१)
  • इतर राज्ये: २५ (२)
  • एकूण: ६८१७  (३०१)
  •  टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात  संसर्गग्रस्त  झालेले आहेत. बुलढाणा आणि जालना येथील एकूण ४ रुग्णांची झालेली दुहेरी नोंद आज दुरुस्त करण्यात आलेली आहे)
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा