Advertisement

coronavirus update: कोरोना नमुण्यांसाठी मुंबईत १०० फोटो बूथ बसवणार

कोरोना उपचारांसाठी नवीन तंत्रज्ञान आणलं जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बूथ सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे.

coronavirus update: कोरोना नमुण्यांसाठी मुंबईत १०० फोटो बूथ बसवणार
SHARES

देशभरात पीपीई किटची जाणवणारी टंचाई लक्षात घेऊन कोरोनाबाधितांवर (corona patient) उपचार करण्यासाठी फोटो बूथ सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. मुंबईत असे १०० फोटो बूथ बसविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली. 

पीपीई किटची आवश्यकता नाही

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, कोरोना उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आणलं जात आहे. देशभरात पीपीई किटची (ppe kit) टंचाई आहे. त्यामुळे पीपीई किटची गरज भासू नये, यासाठी आता फोटो बूथ सिस्टीमचा (photo booth system) वापर करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांवर होणार प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग

त्यासाठी एक छोटी रुम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (doctor) उभी राहू शकेल. त्या रूममधून केवळ हात बाहेर निघू शकेल. ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटो बूथ बसविण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. 

धोका कमी होण्यास मदत

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे डाॅक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यातच पीपीई किटची उपलब्धता कमी असल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करावे लागत आहेत. फोटो बूथ सिस्टिमच्या मदतीने हा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. 

असे घेतात स्वॅब नमुने

काही राज्यांमध्ये फोटो बूथ पद्धतीचा वापर करून स्वॅबचे नमुने गोळा करण्यास सुरूवात देखील झाली आहे. एका चौकोनी आकाराच्या बूथमध्ये एक वैद्यकीय कर्मचारी बसलेला असतो. त्याच्यासमोर काच असते, या काचेला बाहेरच्या बाजूने जाणारे दोन ग्लोव्हज लावलेले असतात. या ग्लोव्हजमध्ये हात घालून वैद्यकीय कर्मचारी समोरच्या व्यक्तीचे स्वॅब नमुने सहजपणे घेतो. यातून दोघांमध्ये कुठलाही संपर्क होत नाही. या पद्धतीमुळे पीपीई किटची फारशी आवश्यकता भासत नाही. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा