Advertisement

Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांवर होणार प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मुंबईत प्लाझ्मा थेरपीचा (plasma therapy for corona patient in mumbai) प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांवर होणार प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग
SHARES

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी मुंबईत प्लाझ्मा थेरपीचा (plasma therapy for corona patient in mumbai) प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली. 

‘अशी’ असेल थेरपी

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, मुंबईतील कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीनुसार उपचाराचे प्रयोग केले जाणार आहेत. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज (antibidies) वाढविण्याचं काम करतील.

हेही वाचा - दिलासादायक बातमी, ९ कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन रुग्ण नाही

अद्याप खात्रीशीर इलाज नाही

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी देशातील लॉकडाऊन (lockdown) ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आतापर्यंत ५०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. जगभरात संशोधन सुरू असलं, तरी अजूनपर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. पण प्लाझ्मा थेरपीचा वापर करून कोरोनाबाधितावरील उपचार यशस्वी झाला आहे. अजून तरी हा खात्रीशीर इलाज नसला, तरी डाॅक्टर या उपचार पद्धतीमुळे काही डाॅक्टरांचं मनोबल उंचावलं आहे. 

प्रकृतीत सुधारणेचा दावा

दिल्लीतील एका रुग्णालयात ४९ वर्षांच्या रुग्णाला त्याच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. या थेरपीनंतर संबंधित  रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यात आलं. तसंच त्यांच्या दोन टेस्टही निगेटिव्ह आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. 

हेही वाचा - Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना हाॅटस्पाॅट १४ वरून ५ वर आले- राजेश टोपे

आयसीएमआरची मान्यता

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देखील कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील ८०० मिली रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून ॲण्टीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. काही शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याचं म्हटलं आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा