Advertisement

मुंबईत आठवड्याभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार- राजेश टोपे

गोरेगाव इथं २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होईल.

मुंबईत आठवड्याभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार- राजेश टोपे
SHARES

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचं (more than 8000 hospital beds will available in mumbai for corona patient says rajesh tope) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहिसर, भायखळा इथं कोविड सेंटर उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे.

१२ हजार खाटा

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे १२ हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे. 

हेही वाचा - अरे बापरे! राज्यात दिवसभरात 99 जणांच्या मृत्यूची नोंद, तर 2940 नवे रुग्ण

सेंटर कार्यान्वित

गोरेगाव इथं २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होईल. त्यापाठोपाठ मुलुंड येथे २ हजार खाटा, दहिसर इथं २ हजार आणि भायखळा इथं २ हजार खाटांची उभारणी अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित होईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

जिओ सेंटर

दरम्यान, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच रिलायन्स जिओ कन्व्हेंशन सेंटरची केली पाहणी. येथील जिओ सेंटरमध्ये १५०० रुग्णांची सोय होऊ शकेल एवढी क्षमता आहे. लवकरच त्याचं रुपांतर सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा कोरोना केअर सेंटरमध्ये होणार आहे.

कोरोनाबाधितांमध्ये वाढ

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार १६८ झाली आहे. शनिवारी दिवसभरात २९४० नवे रुग्ण आढळून आले असून दिवसभरात ९९ मृत्यूंची नोंद झालेली आहे. आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ०८१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा