Advertisement

लाॅकडाऊन ५.०: मुंबई, पुण्याला सवलतीची शक्यता कमीच?

सध्या तरी कंटेन्मेंट झोनमध्ये कुठलीही सवलत देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तयारी नसल्याने मुंबई, ठाणे, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊन कडकच असेल, असं म्हटलं जात आहे.

लाॅकडाऊन ५.०: मुंबई, पुण्याला सवलतीची शक्यता कमीच?
SHARES

देशातील पाचव्या टप्प्यातील लाॅकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यानुसार सोमवार १ जूनपासून लाॅकडाऊन ५.० ला सुरूवात होणार आहे. पाचव्या टप्प्यातील लाॅकडाऊन प्रामुख्याने कंटेन्मेंट झोनपुरतंच मर्यादीत ठेवण्यात आलं असून इतर भागातील लाॅकडाऊन ३ फेजमध्ये शिथिल करण्यात येणार आहे. त्यासंबंधी निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर टाकण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी कंटेन्मेंट झोनमध्ये कुठलीही सवलत देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तयारी नसल्याने मुंबई, ठाणे, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊन कडकच असेल, असं म्हटलं जात आहे. 

या शहरांत कडक

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे (new guideline) जारी केली आहेत.  त्यानुसार लाॅकडाऊन केवळ कंटेन्मेंट झोनपुरतंच मर्यादीत राहणार असून टप्याटप्याने देशभरातील सर्व आर्थिक व्यवहार सुरु होणार आहेत. याउलट महाराष्ट्रातील काही मोजक्या रेड झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट असलेल्या शहरात लाॅकडाऊनचे नियम आणखी कडकपणे लागू होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असलेल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांचा समावेश असू शकतो. 

हेही वाचा- मुंबई लोकल सुरू करण्याशिवाय पर्यायच नाही- उद्धव ठाकरे

जोखीम नको

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांतील निवडक संपादकांशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल उपस्थित होते. या संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी करोनाची आकडेवारी पाहून हे संकट आटोक्यात आल्याचं वाटत असलं तरीही येत्या १५ दिवसांमध्ये आणखी काळजी घेण्याची गरज आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी कुठल्याही सवलतीची अपेक्षा करायला नको.

लोकलची आवश्यकता

याचवेळी महापालिकांची आणि  शासनाची रुग्णालये ही कोविड १९ साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचं आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा