Advertisement

दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार दादरमध्ये ५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ३८६ इतकी झाली आहे.

दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे दादर, माहिम या परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या अजूनही चिंता वाढवणारी आहे. मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार दादरमध्ये ५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ३८६ इतकी झाली आहे.

दादरमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असून, गेल्या २४ तासांत ५१ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, आत्तापर्यंत ५४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे २ हजार ७२२ रुग्णांनी कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ही पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. धारावीत सध्या ३ हजार १०२ रुग्ण आहेत. तर गुरुवारी १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर धारावीत सध्या १९४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. समाधानकारक बाब म्हणजे २ हजार ६२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

माहिममध्ये ४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोना रुग्णांचा आकडा ३०८० इतका झाला आहे. तर, सध्या ५४० अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईतील रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४३३ जणांनी करोनावर मात करून सुखरुप घरी परतले आहेत.

धारावी, दादर आणि माहिम हा परिसर जी/उत्तर विभागात येतो. या विभागात आत्तापर्यंत ९ हजार ५६८ करोनाचे रुग्ण आहेत. यामध्ये ७ हजार ७८२ रुग्ण बरे झालेत तर १२८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा