Advertisement

हुशश! 'ते' १२ रुग्ण अखेर कोरोनामुक्त, डॉक्टरांच्या मेहनतीला यश

या १२ रुग्णांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानं डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेनं सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हुशश! 'ते' १२ रुग्ण अखेर कोरोनामुक्त, डॉक्टरांच्या मेहनतीला यश
SHARES

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडत चालली आहे. पण या चिंतेच्या वातावरणात आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेले १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या १२ रुग्णांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानं डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेनं सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मुंबईत कस्तुरबा रुग्णालयासह पालिकेच्या विविध रुग्णालांमध्ये एकूण ३७ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी १२ रुग्णांची सेकंड कोरोना टेस्ट घेण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. कोरोना रोग बरा होत असल्याचं हे लक्षण आहे, असं पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितलंय. याशिवाय इतर कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं सौम्य आहेत.

हे १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी खबरदारी म्हणून त्यांना आणखी १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. १४ दिवसानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार असून त्यांचे रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी होम टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या डॉक्टरांचं पथक तयार करण्यात आलं असून हे पथक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्या रक्ताचे नमुने घेतील. तसंच होम क्वॉरंटाइन होण्याबाबतच्या सूचना संबंधितांना करतील.

आज महाराष्ट्रात आणखी चार नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४१ रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आतापर्यंत ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नुकताच ६५ वर्षीय एका व्यक्तीचा कस्तुरबात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर येतंय.   हेही वाचा

रिलायन्सने उभारलं कोरोना समर्पित हॉस्पिटल

मुंबईत सोडिअम हायड्रोक्लोराईडची फवारणी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा