Advertisement

Coronavirus Outbreak: जगातल्या ‘या’ मोठ्या नेत्यांनाही झाला कोरोना!

अमेरिका, मध्य-पूर्व, यूरोप, आशिया आणि लॅटीन अमेरिकेसह जगभरातील एकूण ११४ देशात पसरला आहे. तर ४ हजारहून अधिक रुग्णांचा कोरोना व्हायरसने जीव घेतला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जगभरातील राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. चला नजर टाकूया...

Coronavirus Outbreak: जगातल्या ‘या’ मोठ्या नेत्यांनाही झाला कोरोना!
SHARES

 चीनच्या वुहान (china wuhan city) शहरातून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने (corona virus) विविध देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. अमेरिका, मध्य-पूर्व, यूरोप, आशिया आणि लॅटीन अमेरिकेसह जगभरातील एकूण ११४ देशात पसरला आहे. तर ४ हजारहून अधिक रुग्णांचा कोरोना व्हायरसने जीव घेतला आहे. 

भारतातही कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोनाचे ७५ रुग्ण आढळून आले आहे. यापैकी ५८ जण भारतीय असून १७ परदेशी नागरिक आहेत. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जगभरातील राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. चला नजर टाकूया या नेत्यांवर...   

१ - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीला लागण 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची पत्नी सोफी ग्रेगोइर ट्रुडो (Sophie Gregorie Trudeau, wife of Canada’s Prime Minister Justin Trudeau) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सोफी या नुकत्याच यूकेतून परतल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये फ्लूसदृश लक्षणं जाणवल्यानं त्यानं डॉक्टरांकडे नेण्यात आलं, अशी माहिती स्वत: जस्टिन ट्रुडो यांनी ट्विटरवरून दिली. जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मात्र, केवळ खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी वेगळ्या जागी ठेवण्यात येणार आहे. असं असूनही जस्टिन ट्रुडो हे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली.

२ - ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोना 

ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नंदीन डॉरिस (UK Health Minister Nadine Dorries) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मी घरातच थांबणार असल्याचं त्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं आहे. नंदीन डॉरिस गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक लोकांना भेटल्या होत्या. त्याचबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचीही त्यांनी भेट घेतली होती. नंदीन डॉरिस या ब्रिटनमधील पहिल्या राजकीय नेत्या आहेत, ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

३ - इराणच्या उप आरोग्यमंत्र्यांना कोरोना 

इराणमध्येही कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून या व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये इराणचे उप-आरोग्य मंत्री इराज हरिची (Iraj Harirchi – Iranian Politician) यांच्यासह एका इराणी खासदाराचाही समावेश आहे. तर इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद जरीफ यांचे सल्लागार हुसेन शेखोलसलाम यांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. इराणमध्ये साडेतीन हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून १०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

४ - फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्र्यांना कोरोना

फ्रान्सचे ४६ वर्षीय सांस्कृतिक मंत्री फ्रँक रायस्टर (French Culture Minister Franck Riester) यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. रायस्टर यांची चाचणी घेतली असता, ही चाचणी पाॅझिटिव्ह आढळून आली. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती फ्रान्सच्या सरकारने दिली आहे. सद्यस्थितीत फ्रान्समध्ये दीड हजारांहून अधिक कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले असून २५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्सच्या संसदेतील ५ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

५ - इटलीच्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्याला कोरोना

इटलीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते निकोला झिंगारेटी (Italian Democratic Party leader Nicola Zingaretti) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. झिंगारेटी यांनी स्पष्ट फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे. चीननंतर कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांमध्ये इटलीचा दुसरा क्रमांक लागतो. इटलीमध्ये १२ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून आठशेहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


हेही वाचा-

Coronavirus Updates: मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मिळणार सॅनिटायझर

आवश्यकता भासल्यास 'कस्तुरबा'मध्ये खाटांची संख्या १०० पर्यंत वाढवणार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा