Advertisement

राज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू

मुंबईत १४९१२ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५४५७ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत.

राज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण, दिवसभरात १११ जणांचा मृत्यू
SHARES

आज राज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर आज १११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे. तसेच आज ५०२७ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६९५२०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२% एवढा झाला आहे.

हेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १०९८९४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८३२१७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५४७७९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६०७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४९१२ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५४५७ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा २०४२५ इतका आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत चढ उतार होत आहे. मात्र गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या दोन आकडी होती.  मात्र आज दिवसभरात मृतांचा आकडा १११ वर जाऊन पोहचला. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ही ४७,५७ एवढी झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा