Advertisement

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी टाटांकडून पंचतारांकित हॉटेलवर राहण्याची सोय

टाटा समूहाने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या पंचातारांकित हॉटेलची दारं उघडली आहेत.

कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांसाठी टाटांकडून पंचतारांकित हॉटेलवर राहण्याची सोय
SHARES

 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र मेहनत करत आहे. त्यामुळे टाटा समूहाने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या पंचतारांकित हॉटेलची दारं उघडली आहेत. या हॉटेल्सवर त्यांच्या राहण्याची आणि विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय करण्याचा निर्णय टाटा समूहाने घेतला आहे. टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसी) मुंबईतील आपल्या कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस, वांद्र्यातील हॉटेल ताज लँड, सांताक्रुझ येथील हॉटेल ताज, द प्रेसिडेंट आणि अंधेरीतील हॉटेल जिंजर या  ५ पंचतारांकीत हॉटेल्समध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय केली आहे. 

याशिवाय गोव्यातल्या मडगाव येथील आणि नोएडा येथील हॉटेल जिंजर येथे देखील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.  टाटा समूह डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पंचतारांकीत हॉटेलमधील खोल्या विनामुल्य देणार आहेत.  कोरोनाविरोधातील लढाईसाठी याआधी टाटा समूहाने १५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.



हेही वाचा

CISF च्या 11 जवानांना कोरोनाची लागन

मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्ताची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा