Advertisement

वसईतही होणार कोरोना चाचणी

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिल्यामुळे आता वसईमध्येही कोरोना चाचणी होणार आहे.

वसईतही होणार कोरोना चाचणी
SHARES

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिल्यामुळे आता वसईमध्येही कोरोना चाचणी होणार आहे. कोरोना संशयितांचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी मुंबईत पाठवण्याची आता गरज भासणार नाही. त्यामुळे वसई-विरार महापालिकेला दिलासा मिळाला आहे.

 वसई-विरार महापालिकेच्या अगरवाल अलगीकरण केंद्रात कोरोना चाचणी घेण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. वसईत सरकारी कोरोना चाचणी प्रयोगशाळा हवी, अशी मागणी करणारे पत्र वसईतील सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पाठवले होते.  

२५ एप्रिल रोजी आरोग्यमंत्र्यांनी याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुख्य सचिवांनी  २८ एप्रिल रोजी  वसई-विरार शहर महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना यासंदर्भात कार्यवाही करण्यास सांगितलं होतं. आयुक्तांनी संबंधित विभागाकडे तात्काळ कार्यवाहीसाठी पत्र पाठवल्याचे चरण भट यांना ५ मे रोजी कळवले होते. मात्र याप्रकरणी विलंब होत होत होता. त्यामुळे भट यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रोज सरासरी ३०० रुग्ण कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, वसईमध्ये कोरोना चाचणीची व्यवस्था नाही. त्यामुळे वसईत केवळ नमुने घेऊन ते चाचणीसाठी मुंबईला पाठवले जातात. यामध्ये बराच वेळ जात असल्याने चाचणीचे अहवाल वेळेवर मिळत नाहीत. परिणामी रुग्णावर उपचारासही उशीर होतो, ही बाब भट यांनी मानवाधिकार आयोगाच्या निदर्शनास आणली होती.

त्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नागपूर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. मीना मिश्रा यांनी पालिकेच्या वसईतील अगरवाल अलगीकरण केंद्राची पाहणी केली होती. या ठिकाण असलेली सुविधा, अद्ययावत साधनसामग्री तसंच प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आदींचा आढावा घेऊन त्यानुसार अहवाल दिला होता.हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्याRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा