Advertisement

कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार 'हे' औषध

मुंबईकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महापालिकेनं एक खास औषध देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार 'हे' औषध
SHARES

सध्या देशभरात कोरोनानं (Coronavirus Update) हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown in Mumbai) लागू करण्यात आला आहे. असं असलं तरीही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता एखादी लस किंवा औषध हेच कोरोनाला मात देऊ शकतं. पण अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झाले नाही. पण डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर रुग्ण लवकर बरे होतील. त्यामुळे आता डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सध्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर देत आहेत.

देशातील मुंबई (Mumbai Nes) हे कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळं मुंबईकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महापालिकेनं एक खास औषध देण्याचा निर्णय घेतला आहे. निरोगी लोकांना आर्सेनिक अल्बम या होमिओपथिक गोळ्या देण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे औषध धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे. सध्या धारावी (Corona in Dharavi) आणि वरळी (Worli) हे दोन्ही हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. त्यामुळं येथील निरोगी नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना हायड्रोक्लोरोक्विन हे औषध देण्यात येणार होते, मात्र त्याचे शरीरावर होणारे विपरित परिणाम लक्षात घेता, हा निर्णय रद्द करण्याता आला.

महापालिकेकडे (BMC) आरजू स्वाभीमान नागरी समितीनं अर्सेनिक अल्बत ३० (Arsenicum Album 30) या गोळ्या नागरिकांना तसेच हॉटस्पॉट परिसरातील वृद्धांना देण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार आता या औषधाचे वितरण धारावी आणि वरळी या क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. आजपासून धारावी, माहिम दादर परिसरात या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. पालिकेनं या औषधाचे वितरण करण्याची परवानगी दिली असली तरी, हे औषध घ्यायचे की नाही हा निर्णय नागरिकांचा असणार आहे.



हेही वाचा

मृतदेहांच्या पॅकिंगपासून स्मशानभूमीपर्यंत.. 'त्यांना' मिळणार प्रत्येक डेडबॉडीमागे १ हजार रुपये

टीका करताय? पण एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या, सायन रुग्णालयातील परिचरिकेचं मनोगत...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा