Advertisement

मृतदेहांच्या पॅकिंगपासून स्मशानभूमीपर्यंत.. 'त्यांना' मिळणार प्रत्येक डेडबॉडीमागे १ हजार रुपये

सायनच्या लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांशेजारीच इतर काेरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मृतदेहांच्या पॅकिंगपासून स्मशानभूमीपर्यंत.. 'त्यांना' मिळणार प्रत्येक डेडबॉडीमागे १ हजार रुपये
SHARES
मागील आठवड्यांत मुंबई महानगरपालिकेच्या सायनच्या लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांशेजारीच इतर काेरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर  रुग्णालय प्रशासन आणि सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. 


कोविड-१९ कक्षातील तसंच संशयित कोविड रुग्‍णांच्‍या कक्षातील मृतदेह,  मृत्‍युनंतर ३० मिनिटामध्‍ये रुग्‍णाच्‍या नातेवाईकांच्‍या ताब्‍यात देण्‍याविषयी संबंधितांना निर्देश देण्‍यात आले होते. परंतु अनेकवेळा रुग्‍णाचे नातेवाईक मृतदेह ताब्‍यात घेण्‍यास उपलब्‍ध नसतात. त्यांना वारंवार फोन करूनही ते येण्यास टाळाटाळ करतात.  कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका जास्त असल्याने मृत व्यक्तींच्या आसपास जाण्याची भीती परिचरांना वाटत असल्याने मृतदेहांना हात लावणंही टाळलं जात आहे. त्यामुळे मृतदेह पडून राहतात. या समस्येवर अखेर महापालिकेने तोडगा काढला आहे.  मृतदेहाची जबाबदारी घेणाऱ्या  प्रत्येक परिचरांना प्रत्येकी एक हजार रुपये  देण्या्चा निर्णय पालिकेने घेतला आहे.  


पैशांसमवेत परिचरांना प्रत्येक शिफ्टसाठी नवीन जोडी वैयक्तिक संरक्षक उपकरणे, हातमोजे, विशिष्ट बूट देण्यात येणार आहेत. मृतदेहाची जबाबदारी असलेल्या परिचरांना मृतदेहाचे पॅकेजिंगपासून ते मृतदेह घेऊन त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत अंत्यदर्शनासाठी नेणे याबाबतच्या सर्व पार पाडाव्या लागणार आहेत.

वैद्यकीय कर्मचार्‍यांना आर्थिक लाभ देण्याचा निर्णय बीएमसीचे नवे प्रमुख इक्बाल चहल यांनी सोमवारी आरोग्य कर्मचारी आणि नायर रुग्णालयाचे डीन यांची भेट घेतल्यानंतर घेतला. 

सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका वाॅर्डात जागोजागी खाटांवर ठेवलेले असताना या मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला होता. हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताच, चोहोबाजूंनी सरकारवर टीका व्हायला लागली. 

या वादग्रस्त प्रकारावर रुग्णालय प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देखील देण्यात आलं. या चित्रफितीची सत्‍यता आणि वास्तविकता पडताळण्‍यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्‍यात आली आहे. २४ तासात त्‍याचा अहवाल मागविण्‍यात आला आहे. चौकशीत दोषींवर योग्य ती कारवाई करण्‍यात येईल, असं रुग्णालयाने सांगितलं.  


हेही वाचा -

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा