Advertisement

सावधान! SEX केल्यानं कोरोना पसरणार; शास्त्रज्ञांचा दावा

कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. पण यामागील कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल...

सावधान! SEX केल्यानं कोरोना पसरणार; शास्त्रज्ञांचा दावा
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन लागू असताना देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात शास्त्रज्ञांना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या स्पर्ममध्ये कोरोनाव्हायरस सापडला आहे. त्यावरून शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे की, कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते.


रुग्णांच्या स्पर्ममध्ये कोरोना

चीनच्या शांगक्यू या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३८ पुरुषांना कोरोनाची लक्षणं नव्हती. यांपैकी ६ जणांच्या स्पर्ममध्ये कोरोनाव्हायरस आढळून आला. या ६ रुग्णांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते निरोगी झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या स्पर्ममध्ये पुन्हा कोरोना आढळून आला. दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. 

अद्याप याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. चीनमधील तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे की, कोरोना संक्रमित पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर व्हायरस पसरण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे चीनमध्ये निरोगी रुग्णांनाही शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.


अभ्यासातील काही मुद्दे


  • वुहान यूनिवर्सिटीच्या झॉन्गनान या हॉस्पीटलमधील या अभ्यासाचे रिपोर्ट  medRxiv.org पर प्रकाशित करण्यात आले आहेत.
  • झॉन्गनान हॉस्पीटमध्ये यासाठी आणखीन ८१ कोरोनाबाधित पुरुषांवर अभ्यास केला. 
  • झॉन्गनान हॉस्पीटलमधील डॉक्टरांच्या टीमनं या रुग्णांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन आणि ल्यूटीनाइसिंग हार्मोन्सचा बॅलेन्स बिघडलेला आढळला.  याला  T/LH बॅलेंस पण बोललं जातं. 
  • जर T/LH चा बॅलेंस बिघडला तर याचा परिणाम पुरुषांच्या अंडकोषावर होतो. अंडकोषावर परिणाम झाल्यानं स्पर्म नीट तयार होत नाहीत. यासोबतच सेक्स हार्मोन्सची कमतरता होते.  

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही माहिती समोर आली होती की, कोरोनामुळे पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर परिणाम होत आहे. यामुळे पुरुषांचे अंडकोष खराब होत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील उत्तेजना कमी होत आहे. चीन इथल्या वुहानमधल्या युनिवर्सिटीनं याचा खुलासा केला होता.


सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज?

रॉयटर्न यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात चीनमधील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, अद्याप आम्हाला याबाबत ठोस पुरावे मिळाले नाही आहेत. मात्र काहींच्या स्पर्ममध्ये कोरोना असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आणखी काही रुग्णांची तपासणी आम्ही करणार आहोत. असे असू शकते की भविष्यात कोरोना सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये (STD) येऊ शकतो.


"ठोस पुरावा सापडला नाही"

ब्रिटनच्या शेफील्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अॅलन पैसी यांनी म्हटलं की, आतापर्यंत या अभ्यासाबाबत ठोस पुरावे सापडले नाहीत. मात्र ही शक्यता नाकारता येत नाही. आम्हीही शोध घेत आहोत की स्पर्ममध्ये किती प्रमाणात कोरोना आहे. तसंच, स्पर्ममध्ये किती काळ कोरोना सक्रीय राहू शकता, त्याचे परिणाम यांचा अभ्यास सुरू आहे.

अॅलन यांनी हे पण स्पष्ट केलं की, यापूर्वी इबोला आणि जीका हे व्हायरस पुरुषांच्या स्पर्ममध्ये सापडले होते. त्यामुळे कदाचित कोरोना देखील पुरुषांच्या स्पर्ममध्ये असू शकतो. 


"अपूर्ण अभ्यास"

तर, बेलफास्टच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या प्रजनन औषधांचे अभ्यासक शीना लुईस म्हणाल्या की, हा अभ्यास अपूर्ण आहे. आता यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे.


WHO दिली होती ही माहिती

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज नाही. तरी शारीरिक संबंध ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची (Coronavirus) सौम्य लक्षणंही असतील तरी तुम्हाच्या जोडीदाराला त्याची लागण होऊ शकते.



हेही वाचा

IIT ची कमाल, आता एकच मास्क वापरा ५० वेळा

वैद्यकीय मदतीसाठी जन कोविड हेल्पलाइन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा