Advertisement

मुंबईतल्या एकूण मृतांपैकी ५० टक्के मृत्यू 'या' परिसरात!

मुंबईतल्या 'या' ५ वॉर्डात कोरोनामुळे मृत्यृ झालेल्या रुग्णांचे आकडे अधिक आहेत.

मुंबईतल्या एकूण मृतांपैकी ५० टक्के मृत्यू 'या' परिसरात!
SHARES

मुंबईत कोरोनाव्हायरस या आजारानं आतापर्यंत १००० लोकांचा बळी घेतला. यापैकी ५० टक्के रुग्ण हे मुंबईतल्या ५ वॉर्डमध्ये असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत एकूण २४ वॉर्ड आहेत. त्यापैकी ५ वॉर्डात कोरोनामुळे मृत्यृ झालेल्या रुग्णांचे आकडे अधिक आहेत.

L, E, H (पूर्व), M (पूर्व), K (पश्चिम) या ५ वॉर्डमध्ये कोरोनामुळे मत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. यापैकी ४ वॉर्डात प्रत्येकी १०० हून अधिक रुग्ण दगावले आहेत. तर यातील एक वॉर्ड L मध्ये १५४ च्या घरात रुग्ण दगावले आहेत. L वॉर्डमध्ये रुग्णांच्या मृत्यूचा आकडा अधिक आहे.

या तुलनेत मोठ्या राज्यांमध्ये सारखी किंवा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये १६९, तामिलनाडूत ११९, आंद्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये प्रत्येकी ५६ आणि कर्नाटका ४४ लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.

 वॉर्ड
प्रभाग
पॉझिटिव्ह रुग्ण
मृत्यू
L
कुर्ला, साकिनाका १६६७१५४
Eभायखळा, मुंबई सेंट्रल१७२६१२९
H पूर्ववांद्रे पूर्व, सांताक्रूझ१६८०११६
M पूर्वगोवंडी, मानखुर्द११४०१०८
K पश्चिमअंधेरी पश्चिम१६२३१०३
G उत्तरधारावी, दादर, माहिम२२४१८५
G दक्षिणवरळी, प्रभादेवी१८११७९
K पूर्वअंधेरी पूर्व, विले पार्ले पूर्व१२५४७१
P दक्षिणगोरेगाव७१७५७
Nघाटकोपर११९८५३
P उत्तरमालाड७४४४३
Sभांडुप११५५३९
H पश्चिमवांद्रे पश्चिम५०३३७
डोंगरी, उमरखाडी४११३५
Tमुलुंड५६२२२


प्रशासनानं फक्त कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा देऊ शकते. पण हे मत्यू कोरोनामुळेच झालेत की दुसऱ्या कुठल्या आजारामुळे हे जाणून घेण्यासाठी एक समिती स्थापन करावी लागेल. प्रथमदर्शी आकडेवारी दर्शवते की या ५ प्रभागात ५७ टक्के मृत्यू झाले आहेत.

विशेष म्हणजे G नॉर्थमध्ये सर्वाधिक म्हणजे २००० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण या वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १०० हून कमी आहे. या वॉर्डमध्ये धारावी देखील येतो. तिथं आतापर्यंत ८५ मृत्यूची नोंद झाली आहे.

वॉर्ड L मध्ये १५४ दगावलेल्या रुग्णांपैकी ६६ जणं हे ६० वयोगटातील होते. तर ४०-६० वयोगटातील ६५ रुग्ण, ३१-४५ गटातील १८ रुग्ण, १६-३० गटातील ५ असा रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आहे.

"आम्ही जास्तीत लोकांची स्क्रिनिंग करत आहे. जर रुग्णांमध्ये काही लक्षणं आढळली तर त्यांची तपासणी करत आहोत. त्यांना पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत," असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

याशिवाय L वॉर्डमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२ ट्क्के झाले आहे. १ हजार ६६७ रुग्णांपैकी ८७२ रुग्ण बरे झाले आहेत.

वॉर्ड K पश्चिम (अंधेरी पश्चिम) आणि M पूर्व (गोवंडी आणि मानखुर्द) या प्रभागातील १०० हून अधिक मृत्यू हे झोपडपट्टी परिसरातील आहेत.

झोपडपट्टी परिसरातील घरे छोटी असतात. त्यामुळे लोकं घरात लॉकडाऊन होण्यास तयार नसतात. शिवाय परिसरातील कॉमन शौचालयाची व्यवस्था देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत आहे, अशी माहिती प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिली.

त्यामुळे आता प्रशासकिय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १५ जणांना क्वारंटाईन करत आहेत. या पद्धतीनं चेन तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वॉर्ड H पूर्व (वांद्रे पूर्व, सांताक्रूझ) मध्ये सर्वात जास्त मृत्यूची नोंद आहे. वॉर्डमध्ये दररोज ५०-६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. लॉकडाऊन गंभीरतकेनं नाही घेतला तर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

'या' 5 वॉर्डमध्ये 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

पालिकेची नवी रणनिती, एका रुग्णाच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा घेणार शोध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा