Advertisement

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचं दर 2 तासांनी होणार निर्जंतुकीकरण

मुंबईमधील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शौचालयांद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे.

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचं दर 2 तासांनी होणार निर्जंतुकीकरण
SHARES

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांतून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचे दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे.  पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. सर्वच विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना शौचालयांच्या निर्जंतुकीकरणाचे आदेश देण्यात आले आहेत.शौचालयांचे दरवाजे आतून-बाहेरून, दरवाजाच्या आतील-बाहेरील कडय़ा, हॅन्डल, नळ इत्यादी निर्जंतूक करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईमधील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच दिवसातून केवळ दोन वेळा झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालये निर्जंतूक करण्यात येत होती. शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शौचालयांद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका आहे, याकडे केंद्रीय पथकाने मुंबईच्या पाहणीदरम्यान लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता पालिका आयुक्त चहल यांनी झोपडपट्टय़ांमधील, तसेच प्रतिबंधित क्षेत्रांतील सार्वजनिक शौचालये दर दोन तासांनी निर्जंतूक करण्याचे आदेश परिपत्रक जारी करून २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

वरळी कोळीवाडा, धारावी, नागपाडा, जिजामाता नगर आदी पाठोपाठ चेंबूर, मुलुंड, बोरीवली, अंधेरी, मानखुर्द या भागातील झोपडपट्टय़ांमध्ये कोरोनाचा फैलाव होत आहे. वडाळा संगम नगर, अँटॉप हिलचा परिसर, बांद्रा बेहराम पाडा, मालाड मालवणी, कुरार गाव, देवनार अशा ठिकाणी करोना रुग्ण सापडू लागले आहेत. वर्सोवा कोळीवाडा, सायन कोळीवाडा, माहीम कोळीवाडा इथे सार्वजनिक शौचालयांना काहीही पर्यायी व्यवस्था नाही.


हेही वाचा - 
ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट, संपूर्ण तपशीलासह...
महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा