Advertisement

जेजे रूग्णालयातही होणार कोरोना लस चाचणी

जेजे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचणीला सुरूवात होणार आहे.

जेजे रूग्णालयातही होणार कोरोना लस चाचणी
SHARES

जेजे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचणीला सुरूवात होणार आहे.या प्रकरणी सर्व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरु करण्यात येणार आहे.

भारत बायोटेकने बनवलेल्या स्वदेशी लशीची चाचणी जेजे रूग्णालयात होणार आहे. १ हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात अशाच प्रकारच्या एका वेगळ्या कंपनीच्या लशीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सायन रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन कोरोना लशीची चाचणी होणार आहे. तर केईएम आणि नायर रूग्णालयात सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या कोवीशिल्ड लशीची चाचणी सुरू आहे.

जेजे रूग्णालयातील चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. यासाठी रुग्णालयाकडून पुढील आठवड्यात एक टेलिफोन क्रमांक देण्यात येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांची पात्रता तपासून १ हजार  स्वयंसेवकांना या चाचण्यांमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे. या चाचणीसाठी स्वयंसेवकाचे वय १८ पेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. शिवाय त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नसावा आणि त्याच्या कुटुंबियातही कोणत्याही सदस्याला कोरोनाचा संसर्ग झालेला नसावा.हेही वाचा-

Mumbai Metro मेट्रोसाठी आणखी १२ गाड्या; एकूण संख्या ९६ वर

चोरापासून तरुणीला वाचवलं मग स्वत:च लुटलं; लोकलमधील धक्कादायक प्रकारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय