Advertisement

सोमवारपासून खासगी रुग्णालयातही कोरोना लसीकरण

खासगी रुग्णालयांनाही आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी मिळणार असून सोमवार १५ फेब्रुवारीपासून ठराविक रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

सोमवारपासून खासगी रुग्णालयातही कोरोना लसीकरण
SHARES

खासगी रुग्णालयांनाही आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (coronavirus) परवानगी मिळणार असून सोमवार १५ फेब्रुवारीपासून ठराविक रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यानुसार २० खासगी रुग्णालयांना सुरुवातीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

देशभरात सध्या फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण होणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु केल्यानंतर सुरुवातीला रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, नर्स-डॉक्टरांना लस दिली जाईल.

मुंबई महापालिकेने (bmc) शहरातील खाजगी रुग्णालयांची एक यादी तयार केली आहे. या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा असतील, वेटिंग रुम, ऑब्जर्वेशन रुम आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधा देणारी यंत्रणा असणार आहे.

हेही वाचा- लोकल प्रवासामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ? आरोग्यमंत्री म्हणाले...

आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण ५ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. 

आतापर्यंत कोविन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण (covod19) झालं आहे. ५ लाख ४७ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३ जणांना लस  देण्यात आली आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जात आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचं लसीकरण होणार आहे. साधारणपणे १ मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता आहे.

(covid 19 vaccination will start in private hospital from monday in mumbai)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा