Advertisement

मुंबईतल्या 'या' ९ वॉर्ड्समध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण

मुंबईतील २४ वॉर्डपैकी ९ प्रभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतल्या 'या' ९ वॉर्ड्समध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण
SHARES

मुंबईतील २४ वॉर्डपैकी ९ प्रभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या सरासरीपेक्षा मुंबईतील covid 19  रुग्णांमध्ये ०.१३ टक्के वाढ झाली आहे.

पूर्व उपनगरामधील ५, पश्चिमेकडील ३ आणि १ मध्य मुंबईत ०.१४ टक्के ते ०.२१ टक्क्याचा विकास दर नोंदवला गेला. महत्त्वाचे म्हणजे रुग्ण प्रामुख्यानं झोपडपट्टी नसलेल्या भागातील आहेत.

टिळक नगर, मुलुंड, कुर्ल्यातील नेहरू नगर, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप या मध्यवर्ती भागात बहुतांश रुग्ण आढळत आहेत. पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, अंधेरी आणि जोगेश्वरी (पूर्व) इथून देखील अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मध्य मुंबईचा वाढीचा दर दर्शविणारा एकमेव प्रभाग म्हणजे एफ-उत्तर (०.१५%) असून त्यात माटुंगा आणि धारावीचा समावेश आहे. नागरी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोकल, बसेस आणि इतर मार्गांनी प्रवास करत असल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

एम-वेस्ट प्रभागात ज्यामध्ये चेंबूर आणि टिळक नगरांचा समावेश आहे आणि सध्याचा वाढीचा दर ०.२१ टक्के आहे. सरासरी तपासणी दररोजच्या आठवड्यात १५-२० प्रकरणांपेक्षा दुप्पट झाली आहे.

आरोग्य (एमओएच)चे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूपेंद्र पाटील म्हणाले की, ९८ टक्के रुग्ण टिळक नगर, सुभाष नगर, सिंधी सोसायटी आणि भक्ती पार्कमधील उच्चवस्ती आहेत.

ते म्हणाले, “बर्‍याच घटनांमध्ये चाचणी घेण्यासाठी लोकांनी ४ ते ५ दिवस वाया घालवले आहेत. त्यात कुटुंबातील सदस्यांनाही संसर्ग झाला आहे.”

कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन न केल्यानं वाढत्या घटनांचे सूक्ष्म विश्लेषण, अधिकाऱ्यांनी केले. एल वॉर्ड (कुर्ला) इथं तिसर्‍या क्रमांकाचा विकास दर (०.१७%) आहे.

गेल्या महिन्यापासून दैनंदिन तपासणीत जवळपास ३ टक्के वाढ झाली आहे. २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान प्रभागात १४१ नवीन प्रकरणे पाहायला मिळाली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी सांगितलं की, त्यांच्या प्रभाग स्तरावरील विश्लेषणामध्ये ८० टक्के प्रकरणं उच्चवस्तीत सापडली आहेत, जिथे रूग्णांचा प्रवास इतिहास होता. नेहरू नगर हा एक हॉटस्पॉट आहे. "आम्हाला कंटेन्ट नियमांचं उल्लंघन देखील आढळलं आहे."



हेही वाचा

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा होतेय वाढ

लवकरच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना लसीकरण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा