Advertisement

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा होतेय वाढ

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सेवा मर्यादित वेळेत सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा होतेय वाढ
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सेवा मर्यादित वेळेत सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळं प्रवासी संख्या वाढली असून, ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मला गर्दी दिसू लागली आहे. तसंच, कोरोना रुग्णांची संख्या काहीशी वाढू लागली आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, जर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोना जवळजवळ नियंत्रणात आल्यानं राज्य सरकारनं १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळं पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात सुमारे ४००च्या आसपास असलेली रुग्णसंख्या ५५८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत झालेली वाढ हि चिंताजनक वाढ नाही. मात्र, अशीच वाढ एमएमआर रिजनमध्ये पुढील १० ते १२ दिवस होत राहिल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी स्पष्ट केलं आहे.

२६०० पर्यंत गेलेली रुग्णसंख्या डिसेंबरमध्ये कमी होऊन ४८३ पर्यंत आली होती. जानेवारी महिन्यात ही रुग्णसंख्या ४०० ते ६०० दरम्यान होती. ३१ जानेवारीला ४८३ तर १ जानेवारीला ६३१ इतकी रुग्णसंख्या होती. लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी १ फेब्रुवारीपासून सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे.

रुग्णसंख्या

  • १ फेब्रुवारी - ३२८ रुग्ण
  • २ फेब्रुवारी - ३३४ रुग्ण
  • ३ फेब्रुवारी - ५०३ रुग्ण
  • ४ फेब्रुवारी - ४६३ रुग्ण
  • ५ फेब्रुवारी - ४१५ रुग्ण
  • ६ फेब्रुवारी - ४१४ रुग्ण
  • ७ फेब्रुवारी - ४४८ रुग्ण
  • ८ फेब्रुवारी - ३९९ रुग्ण
  • ९ फेब्रुवारी - ३७५ रुग्ण
  • १० फेब्रुवारी - ५५८ रुग्ण



हेही वाचा -

हवाई प्रवासाच्या भाड्यात ३० टक्क्यांची वाढ

ठाण्यात प्रथमच ई-रिक्षा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा