Advertisement

हवाई प्रवासाच्या भाड्यात ३० टक्क्यांची वाढ

हवाई प्रवासाच्या भाड्यात ५ हजार ६०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा सरकारनं गुरुवारी केली.

हवाई प्रवासाच्या भाड्यात ३० टक्क्यांची वाढ
SHARES

हवाई प्रवासाच्या भाड्यात ५ हजार ६०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा सरकारनं गुरुवारी केली. विमानचालन तज्ञाच्या म्हणण्यानुसार इंधनाच्या दरात होणारी वाढ या दरवाढीस कारणीभूत आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या (MOCA) आदेशानुसार हा एक नित्याचा बदल आहे.

१८०-२१० मिनिटांच्या उड्डाणांसाठी आधिकाधिक १८ हजार ६०० रुपये इतकी आहे. पण आता यात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता १८०-२१० मिनिटांच्या उड्डाणासाठी २४ हजार २०० रुपये मोजावे लागतील. जवळपास ५ हजार ६०० रुपयांची वाढ झाली आहे.

कमीतकमी तासाच्या मार्गावर १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या दरात आणखीन २०० रुपयांची वाढ झाली आहे, असे एमओसीएनं म्हटलं आहे. विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे भाडेवाढ होणं आवश्यक असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

मंत्रालयानं सांगितलं की, “देशातील विमानचालन क्षेत्राच्या कॅलिब्रेट ओपनिंग दरम्यानचे कॅपिंग ऑपरेशन वेळोवेळी वाढवण्यात आले आणि सध्या ते ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत चालू आहे.

मंत्रालयानं देशांतर्गत नवीन भाडेपट्टी जाहीर केली आहे. छोट्या मार्गासाठी कमीतकमी २ हजार २०० आणि जास्तीत जास्त ७ हजार ८०० ही नवीन भाडेपट्टी आहे. याआधी हेच दर कमीतकमी २००० आणि जास्तीत जास्त ६००० इतकी होती. तर लांब मार्गासाठी कमीतकमी ७ हजार २०० आणि जास्तीत जास्त २४ हजार २०० इतकं आहे. यापूर्वीचे हे दर ६ हजार ५०० आणि १८ हजार ६०० इतकी होती.

कोविड १९ च्या दरम्यान सरकारने हवाई प्रवासासाठी निश्चित दर दिले होते. पण हळूहळू सर्व अनलॉक झाल्यानंतर दर वाढवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लादल्यानंतर सर्व अनुसूचित व्यावसायिक प्रवासी उड्डाणे २५ मार्च २०२० रोजी थांबवण्यात आली होती. देशातील स्थानिक उड्डाणं २५ मेपासून पुन्हा सुरू झाली.



हेही वाचा

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १ मार्चपासून सुरू

केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR टेस्ट बंधनकारक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा