रेल्वे रुळावर धावणार रुग्णवाहिका

मुंबई - भारतीय रेल्वेकडून पहिल्यांदाच रेल्वे रूग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. चार डब्ब्यांची ही रुग्णवाहिका आहे. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे अपघात झाल्यास ही रेल्वे रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने पोहोचणार आहे. जखमींवर उपचार करण्यासोबत लहान आॅपरेशन करण्याची सुविधा या रेल्वे रूग्णवाहिकामध्ये आहे. दुर्गम भागात आरोग्य शिबीर या रेल्वे रूग्णवाहिकेच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत.

लोणावळा येथे गुरुवारी झालेल्या रेल्वेच्या आरोग्य शिबिरासाठी या रेल्वे रुग्णवाहिकेने सीएटी ते लोणावळा असा प्रवास केला. या रेल्वे रुग्णवाहिकेत डाॅक्टरांची 15 जणांची टीम सेवेत असणार आहे.

कुंभमेळाव्यात प्रायोगिक तत्वावर ही रुग्णवाहिका चालवण्यात आली होती. रेल्वेच्या या रुग्णवाहिकेने आत्तापर्यंत भुसावळ विभागात धुळे येथे 150 रुग्णांना, सोलापूर विभागात वाडी येथे 681 रुग्णांना, नागपूर विभागात भांडक येथे 292 जणांना अशा ठिकाणी सेवा दिली आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

Loading Comments